इंडियन करन्सी मार्केट

>>प्रवीण धोपट

इंडियन करन्सी मार्केट हे एक असे डिसेंट्रलाईज ग्लोबल मार्केटआहे, जिथे सहभागी होणारे वेगवेगळ्या देशांच्या करन्सीमध्ये ट्रेड करीत असतात. स्टॉक मार्केटमधील व्यवहाराच्या तुलनेत करन्सी ट्रेडिंग तितकेसे प्रसिद्ध नसले तरी सध्या कमी भांडवलात ट्रेड करता येतात म्हणून अनेक लोकांनी करन्सी ट्रेडिंगकडे आपला मोर्चा वळवला आहे.

करन्सी मार्केटची वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे

सहभागी – वेगवेगळ्या स्तरांतील व्यक्ती आणि संस्था या व्यवहारात अधिकृतपणे सहभागी असतात. उदाहरणार्थ, बँक, फायनान्शियल इन्स्टिटय़ूट्स, कॉर्पोरेट्स, सरकार आणि व्यक्तिगत ट्रेडर. रिझर्व्ह बँकेचे लक्ष या व्यवहारांवर असते. अधिकृत डिलर्स करन्सी ट्रँझॅक्शन सुकर करण्याचे काम करीत असतात.

करन्सी पेअर्स – करन्सी या पेअर्समध्ये किंवा जोडीनेच ट्रेड होत असतात. इंडियन करन्सी मार्पेटमध्ये रुपया (आयएनआर) हा मेजर इंटरनॅशनल करन्सी म्हणून ओळखल्या जाणाऱया यूएस डॉलर (USD), युरो (EUR), ब्रिटिश पाऊंड (GBP) आणि जापनीज येन (JPY ) या करन्सी पेअरमध्ये ट्रेड होत असतो.
एक्स्चेंज रेट्स – एक्स्चेंज रेट म्हणजे एका करन्सीच्या तुलनेत दुसऱया करन्सीची प्राईस रेट. हा रेट अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, डिमांड आणि सप्लाय, इकॉनॉमिक इंडिकेटर्स, भू-राजकीय संबंध आणि सेंट्रल बँकेच्या पॉलिसीज या सर्वांचा मिळून एक्स्चेंज रेटवर परिणाम होत असतो.

मार्केटअवर्स

फॉरेक्स मार्केटआठवडय़ातले पाच दिवस आणि दिवसाचे चोवीस तास सुरू असते. इंडियन करन्सी एक्स्चेंजची वेळ सकाळी 9 ते 5 अशी असते. जगातील मेजर फायनान्शियल एक्स्चेंजेस, ज्यात लंडन, न्यूयॉर्क, टोकियो, सिडनी यांचा समावेश होतो. त्यांचे पंटिन्युएशनमध्ये ट्रेडिंग सुरू असते.

वायदा बाजार

मार्केटमध्ये स्पॉट मार्केटम्हणून एक सर्वसाधारण टर्म असते, ज्यामध्ये करन्सी खरेदी किंवा विकल्या जातात. त्याच्या जोडीलाच वायदा बाजारातसुद्धा करन्सी ट्रेड केल्या जातात. ज्यामध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्सचा समावेश होतो.

रेग्युलेशन

आपल्या देशात रिझर्व्ह बँक आणि सेंट्रल रेग्युलेटरी ऑथोरिटी या मार्पेटमधील व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे काम करीत असतात. या संस्थांकडून वेगवेगळ्या पॉलिसी डिझाइन केल्या जातात, स्थिरतेसाठी वेगवेगळे निर्बंध आखले जातात. ज्यायोगे एक्स्चेंजमध्ये स्थिरता आणि वेगवेगळ्या देशांतून होणाऱया या व्यवहारांमध्ये सहजता राहील.

अर्थकारणावरील परिणाम

एक्स्चेंज रेटच्या हालचालींचा परिणाम देशातल्या अर्थकारणावर होत असतो. देशातल्या एक्स्चेंज रेटचा परिणाम आयातीवर होत असतो. महागाईचा दर काबूत ठेवणे आणि विदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यावरही त्याचा परिमाण होत असतो.

याचाच अर्थ करन्सी मार्केटकेवळ ट्रेडिंगसाठीचे साधन नाही, तर त्याचा परिणाम जागतिक आर्थिक यंत्रणेवर होत असतो. इंटरनॅशनल ट्रेड आणि अर्थव्यवस्थेची स्थिती यासाठीही करन्सी मार्केटही एक जबाबदार संस्था आहे यात शंका नाही.

(लेखक दीपंकर फिनपॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)