डेव्हीड हेडलीच्या प्रत्यार्पणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हीड कोलमन हेडलीच्या प्रत्यार्पणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती बुधवारी सरकारने लोकसभेत दिली. डेव्हीड हेडली सध्या अमेरिकेत शिक्षा भोगत आहे.  परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितले की, ‘हेडलीच्या प्रत्यार्पणासाठी सरकार अमेरिकेतील एजन्सीच्या संपर्कात आहे. हिंदुस्थान आणि अमेरिकेत 1997 मध्ये प्रत्यार्पण करार झाला आहे. त्याअंतर्गत हेडलीला हिंदुस्थानात आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी 13 ते 15 डिसेंबरदरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेचे एक पथक अमेरिकेत गेले होते.’ हेडलीवर 26/11च्या मुंबई हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. हेडलीला मुंबई हल्ल्यातल्या सहभागासाठी दोषी ठरवत अमेरिकेने 35 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.