
हॉकी वर्ल्डकपमधील निराशाजनक कामगिरीनंतर हिंदुस्थानी संघात राजीनामा सत्र सुरू झाले असून संघ प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी आपल्या पदाचा राजीनामा संघ व्यवस्थापनाकडे दिला आहे. एवढेच नव्हे तर, त्यांच्यापाठोपाठ शास्त्र्ााrय सल्लागार मिचेल पेंबरटन, विश्लेषणात्मक प्रशिक्षक ग्रेग क्लार्क यांनीही आपले पद सोडले आहे.
काल संपन्न झालेल्या हॉकी वर्ल्डकपमध्ये यजमान हिंदुस्थानी संघाकडून 140 कोटी हिंदुस्थानींना जगज्जेतेपदाची आशा होती, पण संघाने घोर निराशा केली. हिंदुस्थानी संघाला वर्ल्ड चॅम्प होताना पाहायचे होते आणि आपला संघ नवव्या स्थानावर फेकला गेला. त्यामुळे स्पर्धेनंतर संघांच्या कामगिरीचे पोस्टमॉर्टेम होणार हे स्पष्ट होते. त्याचा पहिला फटका प्रशिक्षक रीड यांना बसला. एप्रिल 2019 सालापासून हिंदुस्थानी हॉकी संघाचे प्रशिक्षक असलेल्या रीड यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपला राजीनामा हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिकाaकडे दिला. त्यांच्याच देखरेखीखाली संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. त्याचबरोबर 2021-22 च्या हॉकी प्रो लीगमध्ये त्यांनी संघाकडून जोरदार कामगिरी करून घेतली. याशिवाय गेल्या वर्षी बार्ंमगहम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थान उपविजेता ठरला होता. मात्र हिंदुस्थानी संघ वर्ल्डकपमध्ये उपउपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.
पद सोडण्याची वेळ आली
आता वेळ आलीय मी पद सोडण्याची. पुढच्या व्यवस्थापनाकडे जबाबदारी देण्याचीही वेळ आलीय. संघ आणि हॉकी इंडियाबरोबर काम करायला मिळणे हे मी माझा सन्मान आणि भाग्य मानतो. मी या शानदार आणि दमदार प्रवासात प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. मी संघाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असे म्हणत रीड पदमुक्त झाले.

























































