मालवणचे वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवणचे लिओ वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. 2017 मध्ये ते प्रथम आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवडून आले होते. मूळचे सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण येथील असलेल्या लिओ यांची दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याने हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आयर्लंड आणि हिंदुस्थानचे ऐतिहासिक संबंध असून ते पुढे घेऊन जाण्याबरोबरच दोन्ही देशांच्या आर्थिक विकासासाठी एकत्र काम करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. लिओ यांचे वडील अशोक वराडकर हे 1973 मध्ये हिंदुस्थानातून आयर्लंडला गेले होते. 2017  मध्ये अवघ्या 38 वर्षांचे असताना लिओ आयर्लंडचे पंतप्रधान झाले होते.  तेव्हा ते आयर्लंडचे सर्वात कमी वयाचे पंतप्रधान ठरले होते.