इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन :  सिंधूची अंतिम फेरीत धडक, जेतेपदाच्या लढतीत यामागुचीला भिडणार

51

सामना प्रतिनिधी ।  जकार्ता

ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणार्‍या पी. व्ही. सिंधूने शनिवारी आपला शानदार फॉर्म कायम राखताना इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. हिंदुस्थानच्या या ‘शटलक्वीन’ने उपांत्य फेरीच्या लढतीत ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियन चीनच्या चेन फेई हिला 21-19, 21-10 अशा फरकाने पराभूत करीत जेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली. आता उद्या होणार्‍या जेतेपदाच्या लढतीत तिच्यासमोर जपानच्या अकाने यामागुचीचे आव्हान असणार आहे.

ऍडव्हांटेज शटलक्वीनकडे

पी. व्ही. सिंधू व अकाने यामागुची यांच्यामध्ये महिला एकेरीची जेतेपदाची लढत रंगणार आहे. यावेळी दोन खेळाडूंमधील लढतींच्या निकषावर नजर टाकल्यास पी. व्ही. सिंधूकडे ऍडव्हांटेज असेल हे प्रकर्षाने दिसून येत आहे. 10-4 अशा फरकाने हिंदुस्थानची ‘शटलक्वीन’ आघाडीवर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या