अनंतनाग महामार्गावर आयईडीच्या सापडल्याच्या सूचना, अमरनाथ यात्रा थांबवली

27

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरच्या अनंतनाग महामार्गाजवळ आयईडी सापडल्याच्या सूचना मिळाल्याने अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. सुरक्षा दलांना मीर बाजार येथे आयईडी असल्याचा संशय असून तिथे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी जवळपास तीन हजारांहून अधिक भाविकांचा एक जथ्था यात्रेसाठी रवाना झाला आहे. मंगळवारी आयईडी असल्याची माहिती मिळताच सुरक्षादलांनी श्वानपथकासह संशयित जागी शोधमोहीम सुरू केली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात ही यात्रा थांबवण्यात आली आहे.

यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी कडक पहारा असून कसून चौकशी आणि तपासणी केली जात आहे. या तपासणीचा भाविकांना त्रास होत असला तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा दल कोणतीही जोखीम उचलणार नाहीत. जवळपास 46 दिवस चालणारी ही यात्रा राखी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी समाप्त होईल. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा दले सतर्क आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या