भीमा कोरेगाव प्रकरण- रश्मी शुक्ला यांची 6 तास चौकशी; विश्वास नांगरे यांचीही चौकशी होणार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमा कोरेगाव प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची आज 6 तास चौकशी केली. यावेळी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. दरम्यान, तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनाही आयोगाने चौकशीसाठी बोलावले आहे.

आयोगाकडून आज चौकशीनंतर रश्मी शुक्ला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, सरकारी वकील शिशिर हिरे यांनी या चौकशीबाबत माहिती देताना शुक्ला यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचे सांगितले. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे वकील ऍड. आशिष सातपुते यांनी नांगरे-पाटलांना साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर बोलवण्यासाठी परवानगी मागितली. ती मान्य करण्यात आली. त्यामुळे पाटील यांना यांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. मात्र, नेमके केव्हा हे स्पष्ट केले नाही. कोरेगाव भीमा दंगलीवेळी पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, भीमा कोरेगाव घटनेनंतर पुण्यात कोणतीही घटना घडली नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.