Instagram पोस्टवरील लाईक्स लपवता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या पोस्टला किती लाईक्स आणि कमेंट्स मिळतात याकडे सोशल मीडिया युजर्सचे बारकाईने लक्ष असते. परंतु अनेकदा पोस्टला कमी लाईक्स मिळाल्याने काही युजर तणावात जातात. आता इन्स्टाग्राम लवकरच एक भन्नाट फीचर आणण्याच्या तयारीत आहे. ज्यात युजर्स आपल्या पोस्टवरील लाईक काऊंट लपवू शकणार आहेत. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे.

या दरम्यान इन्स्टाग्राम युजर्सला दोन पर्याय मिळतायत. आपल्या पोस्टवरील लाईक्स लपवण्याचा आणि दुसरा म्हणजे इतरांच्या पोस्टवरील लाईक्स पाहायचे की नाही ते ठरवण्याचा. इन्स्टाग्रामचे सीईओ एडम मोसेरी म्हणाले, आम्ही एका नव्या पर्यायावर टेस्टिंग करत आहोत. ज्यात युजरच ठरवेल की, लाईक काऊंट फीचर ऑन ठेवायचे की नाही. इन्स्टाग्रामची मालकी असलेली फेसबुक ही कंपनी देखील लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर या फीचरचे टेस्टिंग सुरू करणार आहे.