40 लाखांची खंडणी मागणारा इराणी अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तक्रार मागे घेण्यास मध्यस्थी करतो, असे सांगत महिलेकडे तब्बल 40 लाखांची खंडणी मागणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केली. फर्जाद मोहम्मद रिझा फखाबादी (वय 31 रा. सांळुखे विहार, एन. आय. बी. एम. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या मुलावर 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यातील फिर्यादी माझी मैत्रिण असून तिला मी केस मागे घेण्यास. मी अंजुमन इराणी गु्रपचा साथीदार असल्याचे धमकावून त्याने महिलेला 40 लाखांची खंडणी मागितली. 6 ऑक्टोबरला दुचाकीस्वार तिघांना महिलेला गाठून 40 लाख रूपये द्या. नाहीतर बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, युनीट दोनने फर्जादला अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, एपीआय विशाल मोहिते, संजय जाधव, उज्वल मोकाशी, मोहसीन शेख, गजानन सोनुने, साधना ताम्हाणे, समिर पटेल, निखील जाधव, कादीर शेख यांनी केली.