Lok sabha 2019 निवडणूक आयोग भाजपच्या हातचे बाहुले आहे का? आपचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नवी दिल्लीमध्ये आज सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. वेळापत्रक जाहीर होताच आचारसंहिता लागू होईल. परंतु त्याच पूर्वी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंघ यांनी निवडणूक आयोगाच्या धोरावर टीका करताना निवडणूक आयोग भाजपच्या हातचे बाहुले आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

Lok sabha 2019 निवडणुका जाहीर होताच जनता भाजपच्या जाहिरातींपासून मुक्त होईल!

आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा उशिराने जाहीर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आप नेते संजय सिंघ यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत म्हटले की, ‘निवडणूक आयोग भाजप कार्यालयातून चालवले जाते का? 2014 मध्ये पाच मार्च रोजी लोकसभा निवडणुकांच्या घोषणा झाल्या होत्या. परंतु यावेळी मात्र पाच दिवस उशीर झाला आहे. या पाच दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक रॅली, सभांमध्ये सहभागी झाले. आजही मोदी गाझियाबादमध्ये भाषण देतील आणि त्यानंतर निवडणूक वेळापत्रक जाहीर होईल आणि आता एवढे झाल्यानंतर निवडणूक आयोग म्हणत आहे की जवानांच्या शौर्याचा निवडणुकीसाठी वापर करू नका.’

याआधी बसपाच्या मायावती यांनी निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर देशातील जनता भाजपच्या जाहिरांपासून मुक्त होईल असे ट्वीट केले होते.