दहशतवाद्यांचा पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला, 24 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तान सीमेवर तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान लष्कराच्या चौकीत दहशतवाद्यांनी स्फोटके भरवलेली गाडी घुसवत ती उडवून दिली आहे. डेरा इस्माईल खान भागात ही घटना घडली आहे.

ही चौकी पोलिसांची होती मात्र या चौकीचा वापर लष्कराने करण्यास सुरुवात केली होती. ही चौकी लष्कराचा बेस कॅम्प होती. दहशतवाद्यांनी पहिले गाडीचा वापर चौकीच्या भिंती तोडण्यासाठी केला आणि नंतर गाडी चौकीत घुसवली. दहशतवाद्यांनी यावेली अंदाधुंद गोळीबारही केला. या हल्ल्यामध्ये चौकीतील स्फोटकेही पेटली आणि त्यामुळे मोठा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तेहरीक ए जिहाद नावाच्या तालिबानच्या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या गटाचा पाकिस्तानातील तहरीक एक तालिबान पाकिस्तानशी काही संबंध आहे अथवा नाही हे अद्याप कळू शकलेलं नाही.