
शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2022 सत्रातील आयटीआय प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. या यादीवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना 26 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अकरावी ऑनलाइनपाठोपाठ आता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयानेही आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी 28 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. या यादीची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.
नव्याने अर्ज करण्याची संधी
दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेश फेरीत प्रवेशाची संधी उपलब्ध होण्यासाठी 1 ते 27 ऑगस्टदरम्यान नव्याने प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.
समुपदेशन फेरीसाठी 29 जुलैला रिक्त जागा जाहीर होणार
सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यात येणार आहे. सदर प्रवेश फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील तसेच एकत्रित गुणवत्ता यादीदेखील 29 जुलैला सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. तसेच संस्थास्तरावरील प्रवेश 1 ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रियेच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे.
असे असेल वेळापत्रक
पहिली प्रवेश फेरी – 29 जुलै, सायंकाळी 5 वा.
प्रवेश निश्चिती – 30 जुलै ते 3 ऑगस्ट
दुसरी प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे – 30 जुलै ते 3 ऑगस्ट
दुसरी प्रवेश फेरी – 6 ऑगस्ट, सायंकाळी 5 वा.
प्रवेश निश्चिती – 8 ते 12 ऑगस्ट
तिसऱया प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे – 8 ते 12 ऑगस्ट
तिसरी प्रवेश फेरी – 16 ऑगस्ट, सायंकाळी 5 वा.
प्रवेश निश्चिती – 17 ते 20 ऑगस्ट
चौथी प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे – 17 ते 20 ऑगस्ट
चौथी प्रवेश फेरी – 23 ऑगस्ट, सायंकाळी 5 वा.
प्रवेश निश्चिती – 24 ते 27 ऑगस्ट
























































