विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील व भोकरदन तालुक्यातील नवे वडशेद येथील तरुण शेतकरी गणेश सांडू गुंड (३८) यांनी राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गुंड हे वडशेद येथील मूळचे रहिवासी असून त्यांची चार एकर जमीन आहे. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, चिखली अर्बन बँक आणि बुलढाणा अर्बन बँक या तीनही बँकांकडून कर्ज घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यांच्यावर असलेल्या कर्जाच्या चिंतेमुळे त्यांनी विष प्राशन केले असल्याची शंका ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गणेश गुंड हे गावचे उपसरपंच देखील होते. २६ नोव्हेंबर गुरुवार रोजी गुंड यांनी सकाळी आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले. ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांना शेजाऱ्यांनी तात्काळ उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे एक बहीण, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.