माथेफिरु नर्सने २० रुग्णांना दिले सलाईनमधून विष

64

सामना ऑनलाईन। टोकियो

डॉक्टरांनंतर जर रुग्णांचा विश्वास कोणावर असतो तर ती असते नर्स. या नर्सला सिस्टर म्हणजे बहिण म्हणूनही संबोधलं जातं. कारण ती ज्याप्रमाणे रुग्णाची सुश्रुषा करते ती जवळच्या व्यक्तीशिवाय कोणीही दुसरी व्यक्ती करु शकत नाही. पण जपानमध्ये एका नर्सने या पेशालाच काळीमा फासली आहे. तिने चक्क २० रुग्णांना सलाईनमधून विष देवून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अयुमो कोबुकी (३१) असं तिचं नाव आहे. अयुमोला अटक करण्यात आली आहे.

saliens

हैटोक्यो पासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ओगुची रुग्णालयात अयुमो नर्स होती. रुग्णांची उत्तम सेवा करणारी नर्स म्हणून ती रुग्णालयात लोकप्रिय होती. पण अचानक तिला रुग्णांची चीड यायला लागली. रुग्णांचे कण्हणे, विव्हळणे याचा तिला तिटकारा येऊ लागला. यामुळे ड्यूटी संपण्यास काही वेळ आधी ती रुग्णांना सलाईनमधून विष देऊ लागली. जेणेकरुन रुग्ण तिची ड्यूटी संपल्यानंतर दगावतील व तिच्यावर कोणालाही संशय येणार नाही. दरम्यान, एकापाठोपाठ एक रुग्ण दगावत असल्याने डॉक्टरही हादरले होते. मीडियानेही रुग्णालयावर गंभीर आरोप केले होते. यामुळे दगावलेल्या सर्व रुग्णांचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

त्याच दरम्यान एका नर्सला एका रुग्णाच्या सलाईनमध्ये बुडबुडे आल्याचे दिसले. यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरं असल्याचा तिला संशय आला. तिने ही बाब डॉक्टरांच्या नजरेस आणली. यामुळे डॉ़क्टरांना संशय आला. शवविच्छेदन अहवालातही सर्व रुग्णांचा मृत्यू विष दिल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. यात अयुमो पकडली गेली. तिने २० जणांना सलाईनमधून विष दिल्याची कबुली दिली.

आपली प्रतिक्रिया द्या