बायडन यांचा विजय स्वीकारण्यास चीन- रशियाचा नकार; म्हणाले, अंतिम निकालाची पाहत आहे वाट…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या महासत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोव्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन हे दणदणीत विजयी झाले आहेत. त्यांच्यावर आणि हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र काही असेही देश आहेत ज्यांनी बायडन आणि हॅरिस यांना विजय स्वीकारण्यास नकार दिला आहे. यामध्ये रशिया, चीन आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे. या देशांनी अद्याप डेमोव्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांचा विजय स्वीकारलेला नाही आहे.

सोवमारी चीनने बायडन यांना अभिनंदन करण्यास नकार दिला. चीन अद्याप या निवडणुकीच्या अंतिम निकालाची वाट पाहत आहे. तसेच रशियाने अमेरिकेतील जोपर्यंत निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ठ होत नाही, तोवर बायडन यांना विजय मानण्यास नकार दिला आहे.

काय म्हणाला चीन

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, बायडन यांनी स्वतःला निवडणुकीत विजय घोषित केले आहे. प्रवक्ता वोंग वेनबिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ‘आमचे असे मानाने आहे की अमेरिकेच्या कायद्यांनुसार आणि प्रक्रियेनुसार निवडणुकीचा निकाल निश्चित होईल.’

दुसरीकडे रशियाने अद्याप बायडन यांचा विजय मानण्यास नकार दिला आहे. रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपाला दुजोरा देत निवडणुकांमध्ये झालेल्या गडबडीचा मुद्दा उपस्थित केला आहे. रशियाचे निवडणूक प्रमुख इला पामफिलोवा सोमवारी म्हणाले, ‘अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानाच्या मेलमुळे गडबडीचा मार्ग मोकळा झाला आहे.’

दरम्यान, ज्यो बायडन यांना या निवडणुकीत 7 कोटी 48 लाखांवर विक्रमी मते मिळाली. त्यांना तब्बल 284 इलेक्टोरल मते मिळाली. तर ट्रम्प 214 इलेक्टोरल मतांवरच थांबले. जानेवारीत अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडन सूत्रे हाती घेणार आहेत.