मन की बात-आधी मतदान करा, नंतर अपेक्षाभंगाचे दुःख नको!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

देशातील जनतेने आणि विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने मतदान करायला हवे. आपले कर्तव्य न बजावत नंतर अपेक्षाभंगाचे दुःख करीत बसण्याची सवय आता सोडायला हवी. कारण राजकारण हे क्षेत्र आता युवकांसाठीही महत्त्वाचे ठरतेय. याची चुणूक विद्यमान केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री आणि ऑलिम्पिक पदकविजेते राज्यवर्धनसिंह राठोड यांनी आपल्या कार्याने दाखवली आहे. असे मत अर्जुन पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू माया आक्रे-मेहेर यांनी व्यक्त केलं आहे.

देशाचे सरकार जनहिताच्या अनेक योजना आणते.पण त्यांची योग्य अंमलबजावणी करणारे लोकप्रतिनिधी जनतेलाच निवडून द्यावे लागतात. मग निवडणुकीतील मतदानाबाबत निरुत्साह दाखवणे हे भविष्यात धोकादायक आहे. क्रीडा असो समाजसेवेचे क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रांचा विकास साधणारे समर्थ सरकार निवडणारे जागरूक नागरिकच देशाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतात. योग्य,सक्षम,चारित्र्यवान नेते निवडा आणि पुढची पाच वर्षे सुखात काढा,अशी माझी कळकळीची विनंती सर्वांना आहे. आपण सर्व सुजाण आहात,यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावाल आणि देशाला समर्थ,विकासकारी सरकार मिळवून द्याल, यात शंका नाही.