स्वच्छ सर्वेक्षणात कराड देशात प्रथम क्रमांकावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कराड

एक लाख लोकसंख्येच्या आतील १०० शहरे व एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शंभर शहरांमध्ये कराड शहराने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. केंद्रीय आवास आणि विकास मंत्री हरदिप सिंह पुरी यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवन येथे कराड नगरपालिकेचा गौरव करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या एकूण पाच हजार गुणांपैकी कराड शहरास ४०६३ गुण मिळाले आहेत.

एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या १०० शहरांपैकी महाबळेश्वर आठवा क्रमांक, पाचगणीने १३ वा क्रमांक, तर कोरेगाव शहराने ३६ क्रमांक पटकावला आहे. सेवास्तर प्रगती (संकलन, वाहतूक, प्रक्रिया, विल्हेवाट, शहराची अंतर्गत स्वच्छता, नवीन उपक्रम, माहिती, क्षमता बांधणी) प्रमाणपत्र (स्टार रेटिंग, ओडिएफप्लसप्लस)थेट निरीक्षण (सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता), नागरिकांचा फीडबॅक (जनजागृती) या स्पर्धेच्या निकषांमध्ये कराडला सर्वाधिक स्थान मिळाले आहे. गतवर्षाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात ३९ वा तर राज्यात २३ वा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर स्वच्छतेच्या सर्व निकषात बसत शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे.