Maharashtra Karnatak Border dispute कर्नाटक विधानसभेत सीमावादावर ठराव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे हा वाद चांगलाच चिघळला आहे. त्याचदरम्यान बेळगावमध्ये आजपासून कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून यात बोम्मईंनी यांनी सीमाप्रश्न मांडला आहे.

यावेळी कर्नाटक सीमा प्रश्नावर एकमताने ठराव मंजूर केला व महाराष्ट्रातील नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. जर महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमावादावरची वक्तव्य सुरूच ठेवली तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.