
कर्नाटकातील काँग्रेसचे दिग्गज नेते, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे पहाडी नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेसचे चाणक्य अशीही त्यांची ओळख आहे. ते मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत. शिवकुमार हे कनकपुरा मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते भावुक झाले. गेल्या वर्षी सीबीआय आणि ईडीने त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली होती. ते तुरुंगात होते. ही आठवण सांगताना शिवकुमार म्हणाले, सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या हे कधीही मी विसरू शकत नाही. आजच्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना, नेत्यांना देतो. त्यांनी खूप कष्ट घेतले. कर्नाटकात काँग्रेस विजयी होईल अशी हमी मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना दिली होती ती पूर्ण झाली. यावेळी शिवकुमार ढसाढसा रडले.


























































