
जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा एकदा कश्मीरी पंडिताची हत्या करण्यात आली आहे. शोपियांमधील चौधरी गुंड भागामध्ये या पंडिताची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पूरण क्रिशन भट असे या पंडिताचे नाव आहे. भट हे शोपियांमधील चौधरी गुंड भागाचे रहिवासी होते. आपल्या बागेकडे जात असताना त्यांच्या वर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.
शनिवारी दहशतवाद्यांनी या कश्मीरी पंडितावर गोळीबार केला होता. कश्मिरातील दक्षिणेकडच्या भागात असलेल्या शोपिया जिल्ह्यात हा गोळीबार झाला होता. हल्ल्यात जखमी झालेल्या कश्मिरी पंडिताला रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराची घेराबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

























































