
सामना ऑनलाईन। कोच्ची
केरळमध्ये शबरीमला मंदिरात 2 महिलांनी प्रवेश केल्यानंतर वातावरण तापले असतानाच आतापर्यंत या मंदिरात 10 महिलांनी अयप्पा भगवानचे दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. यात तीन मलेशियन महिलांचाही समावेश आहे. तामिळ वंशाच्या या महिला हिंदुस्थानात आल्या होत्या. 1 जानेवारीला त्यांनी शबरीमला मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांच्यासह अन्य चार महिलांनीही यावेळी मंदिरात प्रवेश केला असा दावा केरळ पोलिसांनी केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राकडे महिलांच्या मंदिर प्रवेशाचा व्हिडीओ आहे. या सर्व महिलांची नावं व घराचा पत्ता पोलिसांकडे असून आवश्यकता असेल तेव्हा त्यांना न्यायालयात आणले जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
























































