कोरं करकरीत…किताबखाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शशिकांत सावंत

वाचक किंवा लेखकांच्या मांदियाळीला किताबखानाने आकर्षित केलं आहे. असं किताबखाना 3 महिन्यांपूर्वी जळलं तेव्हा त्याचे भवितव्य अनिश्चित होतं. मात्र आता ते त्याच उमेदीने पुन्हा उभं राहिलं आहे. पुस्तक वाचणाऱयांचे व्यसन असणाऱयांचं किताबखाना कायमच स्वागत करत राहील एवढे मात्र नक्की.

किताबखाना हे मुंबईतलं प्रशस्त पुस्तकांचं दुकान एक तीन महिन्यांपूर्वी जळून गेलं. अर्थात किताबखान्याच्या पुस्तकवेडय़ा अनेक चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. अगदी देशभरातूनही. किताबखानासारखं दुकान हे मुंबईचं भूषण होतं. याचं कारण असं की, हे दुकान एकमजली आहे. फोर्टसारख्या ठिकाणी ही जागा आणि एक मजल्याचे दालन तेही गॅलरीवजा आणि हे सारं लाकडाचं पण दुर्दैव असं की, याच लाकडाने घात केला. अनेक परदेशी दुकानं असतात त्याचप्रमाणे इथे पॅफे होता आणि त्या पॅफेमधूनच आग लागली.

आग लागल्यावर अनेकांनी तर्कवितर्क केले. हे बंद करायचे होते म्हणून यांनीच आग लावली वगैरे वगैरे. पण 3 महिन्यात मॅथॅलॉजीतल्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे हे दुकान पुन्हा उभं राहीलं आणि सुरूही झालं. नुकताच मी तिथे जाऊन आलो. जगत हा दुकानाचा प्रमुख आणि त्याचे अनेक सहकाही स्ट्रण्ड पासून मला ओळखतात. म्हणजे जवळपास तीस एक वर्षे आमचा परिचय आहे. जगतकडून मी ‘अर्णासन’चं अठराशेचे पुस्तक मी त्याच्याकडून विकत घेतलं होतं. ज्याची किंमत बावीसशे-तेवीसशे रुपये होती. स्ट्रण्डचं मोठं वैशिष्टय़ असं की, 20 टक्के सवलतीने तिथे पुस्तक मिळत आणि हेच वैशिष्टय़ किताबखानाने चालू ठेवलं. स्ट्रण्डचे मालक हे सूट घालून सुटाबुटात उभे असत आणि जगभरातील पुस्तपं वाचकांना देण्याचा प्रयत्न करत.

‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’सारखं 22 खंडाचा मोठा ज्ञानकोश जेव्हा त्यांच्याकडे आला तेव्हा त्यांनी मोठी जाहिरात केली. आणि आता ज्यांना पुरस्कार मिळालंय ते नंदा खरे एक गोष्ट सांगतात की, एक माणूस मुंबई सेंट्रलला गावावरून आला, आपल्या नातवाला घेऊन आणि तिथून चालत येऊन ते खंड त्यांनी आपल्या नातवासाठी विकत घेतले. असंच नंदा खरे आणखीन एक आठवण सांगतात, एक माणूस त्यांना म्हणाला की, स्ट्रण्डच्या मालकाला की, तुमचं हे पुस्तक महाग आहे तर ते म्हणाले, 1960 साली जवळपास तीस वर्षांपूर्वी तुम्ही आला होतात. एक पुस्तक घ्यायला आणि तेव्हाही तुम्ही हेच वाक्य बोलला होतात.

शानबाग यांच्या हाताखाली तयार झालेली ही टीम कारवारी भाषेत एकमेकांसोबत बोलत असतात. गुप्त भाषेत काय बोलतात ते कळत नाही असं आम्ही गमतीने म्हणत असतो. पण माझे वाचनवेडे मित्र कायम किताबखानात चक्कर टाकत असतात आणि पुस्तपं विकत घेत असतात. मग त्यात कुमार केतकर असतील, नितीन रिंढे sअसेल, किशोर कदम असेल. अरुण खोपकर स्ट्रण्ड बंद झाल्याच्या कार्यक्रमात म्हणाले होते की, पुस्तक देणाऱया माणसाला सवलत पैसे वाचवायला नको हवे असते. त्याला सवलत हवी असते ती आणखी एखादं पुस्तक विकत घेता यावं म्हणून. आणि हीच नेमकी परंपरा किताबखानाने चालू ठेवलेली आहे. प्रवेश करताना दर्शनी तिथे सुंदर नवीकोरी पुस्तपं हारीनं लावलेली असतात. त्यानंतर डाव्या हाताला अकाऊंट्स असत.

त्या अकाऊंटला लागून एक हिंदुस्थानी पुस्तकांचे दालन ज्यात चरित्र-आत्मचरित्र जास्त प्रमाणात आहेत. आणि मग लगेच युरोपियन पुस्तकांचा भाग जिथे पुशकिल प्रेस या प्रकाशनाची कुठेही न मिळणारी पुस्तपं अलीकडे दिसायला लागलेली आहेत. विशेषतः स्टिव्हन झॉईकचं ‘वर्ड ऑफ यस्टरडे’ पुस्तक परवाच मी तिथे पाहिले. त्यानंतर इंग्रजी, देशी-परदेशी अमेरिकन अशी नंतर पुढे टोकाला कॉफी टेबल पुस्तकांचा विभाग ज्याच्यात प्रामुख्याने भलीमोठी आकाराची पुस्तपं, पण यादरम्यान तारा प्रेस नावाची जी पुस्तके असतात त्याच्याबद्दल बोलायलाच हवं. लहान मुलांची ही पातळ पुस्तपं अत्यंत महाग असतात. याचं कारण या पुस्तकांचे प्रत्येक पान डाय बनवून तयार केलेले असतात, शिवाय मधुबनी आणि इतर शैलीतलं चित्रकारांनी ही चित्रं केलेली असतात. तरीही ही पुस्तपं इतकी महाग नाही याचं कारण फ्रान्सच्या सरकारने यातील अनेक पुस्तपं सबसडायिज केलेली आहेत.

यानंतर येतो मुलांचा विभाग आणि मग पहिल्या मजल्यावर पूर्ण पेंग्विन क्लासिक पूर्ण पांढऱया रंगातील पेग्विन क्लासिक विसाव्या शतकातील अभिजात पुस्तक आहते तर काळ्या रंगातील पेंग्विन क्लासिकची पुस्तपंही आहेत. जगत खरं तर तसा हरहुन्नरी माणूस नव्हता. पुस्तक एके पुस्तक, दुकान एके दुकान अशीच त्याची वृत्ती होती. परंतु किताबखाना सुरू झाल्यापासून त्यांनी जे पुस्तक धंद्याचा जो कायापालट केला तो बघण्यासारखा आहे. इथे तुम्हाला अगदी वेगळी पुस्तकं मिळणार नाहीत. पण बाजारात येणारी पुस्तपं, मग आता ओबामांचं चरित्र दोन हजार रुपयाला आहे तर इथे तुम्हाला ते सोळाशेत मिळणार.

पुस्तकांच्या दुकानात याप्रकारे सवलत देण्याचे काहीतरी कारणे आहेत. जी पुस्तक विक्रेत्यांनाच माहीत असतात. होतं असं की, एखादे पुस्तक चांगलं खपलं, समजा 10000 हार्ड बाऊंड कॉपी काढलेल्या पुस्तकाच्या आठ हजार प्रती खपल्या तर मग परदेशातील प्रकाशक असं करतात की, उरलेली 2000 पुस्तकं चक्क एक डॉलरला किंवा दोन डॉलरला देऊन टाकतात. 25 डॉलरचं पुस्तक, 20 डॉलरचं पुस्तक एक डॉलरला देऊन टाकतात. याला मीडिएटर सेल म्हणतात. मोठय़ा प्रमाणावर स्ट्रन आणि यातून पुस्तके खरेदी करत असे. किताबखानाही यातून पुस्तपं खरेदी करतो. त्यामुळेच जॉन अपडाईक किंवा जॉन शिवर यांच्यासारख्यांचे हार्ड बाऊंड 25 डॉलरची पुस्तपं आपल्याला इथे फक्त 6-7 डॉलरला चारशे-साडेचारशे रुपयांत पडतात. यामुळेच किताबखाना माझ्यासारख्याच नव्हे तर देशभरातील अनेक वाचकांना आकर्षित करून घेतो.

इथे आलो की पाय निघत नाही. कधी कुमार केतकर येथे बसलेले असतात, कधी अरुण खोपकर. किताबखानाने प्रशस्त जागेचा आणखीन एक चांगला उपयोग केला तो म्हणजे मुंबईतील छोटय़ा-मोठय़ा ज्या काही वाङ्मयीन चळवळी चालतात. कविता वाचनाचा किंवा पुस्तक प्रकाशनाचा असेल याला त्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि वाव दिला. यामुळेच शांता गोखले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन येथे झालं. तसंच प्रसिद्ध अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक राहुल बोस यांनी प्रोडय़ूस केलेल्या सिनेमावरचे पुस्तपंही प्रसिद्ध झालं. आदील जसवालापासून जेन भंडारीपर्यंत अनेक कवी-कवयित्री यांचे छोटे-मोठे कविता वाचनाचे उपक्रम आजही मुंबईत चालू असतात. त्यांना जर कोणी अवकाश देत असेल तर तो किताबखानाच. त्या अवकाशचा अर्थ स्पेस घ्यायचा आणि वेळ असाही. त्यामुळेच मुंबईतील जे काही वाचक किंवा लेखकांची मांदियाळी ती कायमच किताबखानाने आकर्षित केली.

असं किताबखाना 3 महिन्यांपूर्वी जळलं तेव्हा त्याचे भवितव्य अनिश्चित होतं. अनेकांनी तर आता ते पुन्हा सुरू होणार नाही असं भविष्य वर्तवूनही टाकलं. पण पुन्हा किताबखाना सुरू झालं आणि माझ्यासारख्या अनेक वाचकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परवाच किताबखान्यात जाऊन आलो. जळालेली काही पुस्तके अर्ध्या किमतीत लावली होती, पण ती चांगल्या स्थितीत होती आणि मॅक्सवेल पर्किन्स यांचं मोठं महागडं चरित्र चक्क साडेचारशे रुपयांत होतं आणि तेही अर्ध्या किमतीत म्हणजे सवादोनशे रुपयांत मिळालं म्हणजे फुकटंच आणि काहीच घ्यायचं नाही असं ठरवून घेतलेला माणूस ते भलंमोठं पुस्तक पिशवीत घेऊन अखेर बाहेर निघाला. पुस्तक वाचणाऱयांचे व्यसन आणि पुस्तक वाचणारे तळीराम यांच्यासाठी किताबखाना हे मदिरालय आहे एवढे मात्र नक्की.

shashibooks@gmailcom