कोपरगावात एकाच रात्रीत दोन घरफोडया

18

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव शहरात शनिवारी रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. यात चोरटयांनी सोन्‍या-चांदीच्‍या दागिण्यासह सुमारे दिड लाखाचा ऐवज लुटुन नेला असल्‍याच्‍या तक्रारी दाखल झाल्‍या आहेत.

शहरातील सराफ बाजारातील पवार सरकार वाडयात राहणारे शुभ-लाभ साप्‍ताहिकाचे संपादक संजय लाड हे शनिवारी दुपारी कुटंबासह नगर येथे गेले असता चोरटयांनी रात्री घर फोडून घरातील सर्व सामान उचकुन कपाटातील 13 ग्रॅमचे मंगळसूत्र,( 20000 रूपये ), 1 तोळयाचा नेकलेस 15000 रूपये, 5 ग्रॅमच्या सोन्‍याच्‍या दोन अंगठया (15000) एक 5 ग्रॅमची व दुसरी 4 ग्रॅमची (1400) असे सोन्‍या-चांदीचे 64हजार रूपये किमतीचे दागिने 10 हजारांची रोकड (2000 हजाराच्‍या 4 तर 500 चे 2 नोटा )असा 74 हजाराचा ऐवज चोरून नेल्‍याची फिर्याद संजय पुरूषोत्‍तम लाड यांनी कोपरगाव शहर पोलीसांत दिली आहे.

दुसरी घटना शहरातील पुनम टत्तॅकीज मागे काले मळा येथे राहणारे वसांतह श्यामसुदर बजाज यांच्‍या बंद घराचवे कुलुप तोडून घरातुन प्रवेश करून घरातील सर्व सामान उचकुन कपाटातील 10 ग्रॅमची पोत, 3 ग्रॅमच्या सोन्‍याची अंगठी, 2 ग्रॅमची सोन्‍याची नथ असा 30 हजाराचे सोन्‍याचे दागिने व 6000 चे चांदीचे सिक्के असे 36 हजार रूपये किमतीचे सोन्‍या-चांदीचे दागिने व 38 हजारांची रोकड (2000, 500, 200,100 च्‍या नोटा )असा 74 हजाराचा ऐवज चोरून नेल्‍याची फिर्याद वासंती बजाज यांनी कोपरगाव शहर पोलीसांत दिली आहे. तपास सहा. फौजदार भालेराव करीत आहेत. गेल्‍या काही दिवसापासुन कोपरगाव शहरात सातत्‍याने घरफोडया होत आहेत. हातावर हात धरून बसलेल्‍या पोलीसांच्‍या हातावर तुरी देऊन चोर मात्र चो-या करण्यात यशस्‍वी होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या