
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. हिंदुस्थानी संगीता विश्वात आपल्या स्वर्गीय स्वरांच्या योगदानाने ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ स्थान मिळवणाऱ्या लता मंगेशकर यांच्या नावे एक विश्वविक्रम नोंदवलेला आहे.
लता मंगेशकर यांच्या नावे 1974मध्ये एक विश्वविक्रम नोंदवण्यात आला. त्यांनी 1948 ते 1974 या काळामध्ये 20 भाषांमध्ये स्वतंत्र, युगुल आणि एकत्रित अशा तिन्ही पद्धतीची 25 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. 1987मध्ये ही संख्या वाढून 30 हजारांवर गेली. लता मंगेशकर यांनी आतापर्यंत 22 भाषांमध्ये तब्बल 50 हजार गाणी गायली आहेत.

























































