दुचाकीवरील तरुणांनी मारहाण करून मोबाईल पळवला, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी तरुणाच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना शहरातील नारायण नगर भागात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील तांबवा ता. केज येथील प्रविण महादेव कांदे हा लातुरात शिक्षणासाठी आलेला आहे. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तो आणि त्याचा मित्र रूमकडे जात होते. दोन दुचाकीवरून आलेल्या 6 जणांनी त्यांना रस्त्यात अडवले आणि हातामधील मोबाईल खेचून घेतला. फिर्यादीचा मित्र तिथून पळून गेला. आम्ही वाय.के.ग्रुपचे आहोत. माझे नाव यश कातळे आहे, असे यातील असे एकाने सांगितले, तर एकाने खाडे असे आडनाव सांगितले. कोणाला नाव सांगितले तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली. सर्वजण 20 ते 22 वर्षाच्या वयोगटातील होते. पोलिसांनी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.