नगर पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

नगर पालिका, नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील नगर पालिका, नगर पंचायतीमधील कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने केली. मात्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.

यामुळे 29 ते 31 डिसेंबर या कालावधीत कर्मचाऱ्यानी काळ्या फिती लावून काम केले. परंतु शासन दखल घेत नसल्याने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी यांनी सहभाग नोंदवला आहे. अहमदपूर येथे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून धरणे आंदोलन सुरू केले आहे. लातूर जिल्ह्यातील इतर नगर पालिका, नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनीही आंदोलन सुरू केले आहे.