लातुरात तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीस पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी म्हणून घरातून गेलेली लातुरातील पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगल धनराज केली यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी लातुरातील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकत आहे. 17 मार्च रोजी सकाळी आठ वाजता ती घरातून शहरातील नारायण नगर भागात राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी गेली होती. साडेआठ वाजण्याच्या सुमारास मैत्रिणी बोलावले, म्हणून ती दहा मिनिटात परत येते, असे सांगून तिथून बाहेर पडली. नंतर ती परत आलीच नाही. घरीही परत आली नसल्याने घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, कुठेच सापडले नाही. शेवटी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.