
पुणतांबा फाटा ते झगडेफाटा रोडवर डाऊच खुर्द फाटा येथे मोटरसायकलला कंटेनरने समोरून जोरदार धडक दिल्याने मोटार सायकलस्वार ॲड. साहेबराव देवराम औताडे (62) यांचा जागीच दुर्दैव मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी दुपारी साडेबारा एक वाजण्याच्या सुमारास ॲड. साहेबराव औताडे हे कामानिमित्त आपल्या मोटरसायकल क्रमांक एम. एच. 17 सीजे. 9992 ने कोपरगाव कडे येत असताना डाऊच फाटयाजवळ समोरून येणाऱ्या कंटेनर क्रमांक एम एच 04 जेके 3015 डब्ल्यू या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ॲड.साहेबराव औताडे आपल्या मोटरसायकल सह ट्रकच्या खाली आले व ट्रकचा वेग जास्त असल्याने ट्रकने त्यांना मोटरसायकलसह 70 ते 80 फूट फरपटत नेल्याने त्यांचा जागीच दुर्दैव मृत्यू झाला.
डाऊचचे उद्धव ठाकरे शिवसेना सरपंच संजय गुरसळ यांना समजतात त्यांनी गावातील तरुणांना घटनास्थळी बोलवत पोलीस स्टेशनची संपर्क साधला. स्थानिक नागरिकांनी कंटेनर ताब्यात घेतला असून ड्रायव्हर मात्र पसार झाला आहे. औताडे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या अपघाती निधनाने पोहेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


























































