
विधान परिषदेवरील नवनिर्वाचित दहा सदस्यांचा शपथविधी उद्या (शुक्रवारी) दुपारी बारा वाजता विधान भवनात होणार आहे. विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोऱहे या सदस्यांना शपथ देतील. या 10 सदस्यांमध्ये सचिन अहिर, आमशा पाडवी, भाई जगताप प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे यांचा समावेश आहे.

























































