रत्नागिरीत बिबट्याचा पुन्हा हल्ला, एक जण गंभीर

29

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

पावस येथून मेर्वीकडे जाणाऱ्या मोटरसायकलस्वारांवर बिबट्याने झडप घालून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजता घडली.

संतोष कुरतडकर आणि मंगेश खेर्डे हे दोघे मोटरसायकलवरून पावस येथून मेर्वीत निघाले असताना गणेशगुळे येथे चालत्या मोटरसायकलवर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात मंगेश खेर्डे गंभीर जखमी झाले आहेत. या परिसरात बिबट्याचा धूमाकूळ सुरु असून हा पाचवा हल्ला आहे. वनविभाग या घटनेकडे दुर्लक्ष करत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग जिवित हानीची वाट पहातेय का? असा सवाल शिवसेनेचे विभागप्रमुख रविकीरण तोडणकर यांनी विचारला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या