आता येतोय 16 कॅमेऱ्यांचा स्मार्टफोन, वाचा काय असणार वैशिष्ट्य

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिवसेंदिवस जगभरात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या वाढत्या ‘स्मार्ट’ भूकेसाठी विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. ही स्मार्ट भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या स्मार्टफोनला अधिक स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी सॅमसंगने 4 रियर कॅमेरा असणारा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए 9 लॉन्च केला. यासोबत आता 16 लेन्स असणारा रियर कॅमेरा सेटअपवाला स्मार्ट फोन ग्राहकांसाठी बवण्यात येत आहे.

दक्षिण कोरियाची कंपनी एलजीला युनायटेड स्टेट्स पेटेंट आणि ट्रेडमार्क ऑफिसद्वारे (यूएसपीटीओ) 16 लेन्स रियर कॅमेरा सिस्टिम असणारा स्मार्टफोन बनवण्याचे पेटेंट मिळाल्याची चर्चा आहे. एलजीने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तसेच हा 16 लेन्सवाला कॅमेरा फोन कधीपर्यंत लॉन्च करण्यात येईल याबातही माहिती दिलेली नाही. परंतु एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, जबरदस्त फोटो क्वालिटी असणारा हा फोन लवकरच लॉन्च केला जाईल अशी शक्यता आहे.

कसा असेल कॅमेरा?
दरम्यान, हा 16 लेन्सवाला स्मार्टफोनचा कॅमेरा ग्राहकांना नक्कीच पसंद पडण्याची शक्यता आहे. यात एकाचवेळी झपाझप फोटो क्लिक करता येतील. तसेच वेगवेगळ्या फोकल लेंथद्वारे फोटो काढण्याची संधीही युझर्सला मिळेल. पोर्ट्रेट शॉट घेण्यासाठी वाईड फोकल लेंथ हा ऑप्शनही देण्यात येईल. तसेच फोटो काढण्यानंतर तो एडीट करण्याचा देखील पर्याय मिळणार आहे. याची किंमतही तशीच दमदार असण्याची शक्यता आहे.