
अंड्यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतेच, शिवाय यामुळे शरीरातील उष्णता टिकून रहायला मदत होते. यासाठी हिवाळ्यात काही लोकं अंड खाणे पसंत करतात, मात्र आहारात अंड्यांचा अति जास्त प्रमाणात समावेश करणेसुद्धा त्रासदायक ठरू शकते. काही लोक सकाळी नाश्त्यावेळी आवर्जून अंडी खातात. अंडी प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांनी समृद्ध आहेत. अंड्यामध्ये अनेक गुणधर्म असले, तरीही काही आजारांमध्ये अंडी खाणे हानिकारक ठरू शकते.
बरेच लोकं थंडीच्या दिवसांत अंडी खातात. कधी कधी त्याचे प्रमाण जास्त होते. यामुळे काही शारीरिक त्रास वाढण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक वाढण्याचा धोकाही निर्माण होतो. जास्त अंडी खाल्ल्याने ह्रदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. ‘या’ आजारांमध्ये अंडी खाणे त्रासदायक ठरू शकते, जाणून घेऊया.
कोलेस्ट्रॉल
ह्रदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात असणे, अत्यंत आवश्यक आहे. जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. यामुळे ह्रदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
पचन विकार
अंडी जास्त खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. पचनसंस्था बिघडू शकते. अंडी खाल्ल्याने काही वेळा अपचन, उलट्या, मळमळ, डोकेदुखी, पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
इन्सुलिन रेझिस्टन्स
बरेच लोक हिवाळ्यात खूप अंडी खातात. अंड्याचे ऑम्लेट करून, उकडून किंवा कोणत्याही पद्धतीने शिजवून त्याचे सेवन केले जाते. सर्वसामान्य व्यक्तिने एका दिवसात 4 पेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने शरीरावर खूप वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो आणि त्यामुळे शरीर इन्सुलिन रेझिस्टन्स (प्रतिरोधक) बनू शकते.
त्वताविकार
अंडी खाल्ल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या दिसून येते. वास्तविक मुरमं शरीरातील बदलत्या हार्मोन्समुळेही येऊ शकतात. अंड्यामध्ये प्रोजेस्टेरॉन असते, त्यासोबत अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये अल्ब्युमिन असते जे पचण्यास जड असते. त्यामुळे अनेक दुष्परिणाम दिसून येतात.
कर्करोग
अंड्याचे नियमित सेवन केल्याने कर्करोगासारख्या घातक आजाराचा धोका वाढू शकतो. Pubmeddotncbi च्या मते, अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की, जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने कोलोरेक्टलसह इतर कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते.




























































