
चंद्रपूर जिल्ह्यातील म्हातरदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या परिसरात लॉयड्स मेंटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीचे वसाहतीचे अवैद्य बांधकाम थांबवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या परिसरात वसाहतीचे अवैध बांधकाम सुरू असल्याची आम्हाला माहिती झाली आहे. हे बांधकाम पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून सुरू आहे. या बांधकाममुळे येथील पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित कामाची परवानगी सुद्धा ग्रामपंचायत कडून घेण्यात आली नाही आहे.
या संदर्भात योग्य ती चौकशी करून पुढील कारवाई होईपर्यंत सदर बांधकाम थांबवण्यात यावे अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून सरपंच यांनी केली आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश पाटील चोखारे, सचिन राजूरकर, म्हातारदेवीचे सरपंच संध्याताई पाटील, माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य संजय पाटील यांची उपस्थिती होती.


























































