Lok sabha 2019 महाराष्ट्रात कोणत्या मतदार संघात कधी होणार मतदान, वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात सात टप्प्यात निवडणूक होणार असून महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात निवडणूक होईल. 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होईल, 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 10 जागांवर, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील 14 जागांवर तर तर चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 जागांवर मतदान होणार आहे.

Lok sabha 2019 महाराष्ट्रात 4 टप्प्यात मतदान, कोणत्या तारखेला किती जागांवर मतदान?

पहिल्या टप्प्यात विदर्भ, दुस-या टप्प्यात मराठवाड्यातील सहा जिल्हे, तिस-या टप्प्यात संभाजीनगर, जालनासह पश्चिम महाराष्ट्र, खांदेश, कोकणातील रत्नागिरी, नगर, चौथ्या टप्प्यात मुंबईसह कोकण,उत्तर महाराष्ट्रमध्ये मतदान होणार आहे. तुमच्या मतदार संघात कधी होणार मतदान आहे हे जाणून घ्या…

पहिला टप्पा – 11 एप्रिल रोजी 7 जागांसाठी मतदान होणार
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम

दुसरा टप्पा – 18 एप्रिल रोजी 10 जागांवर होणार मतदान
बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर

तिसरा टप्पा – 23 एप्रिल रोजी 14 जागांवर होणार मतदान
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकनगळे

चौथा टप्पा -29 एप्रिल रोजी 17 जागांवर होणार मतदान
नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर – पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई – दक्षिण – मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

याआधी  2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 48 मतदारसंघात 3 टप्प्यात मतदान झाले होते.