
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
संभाजीनगरात ‘लव्ह जिहाद’चा प्रकार वाढतच चालला असून, उच्च शिक्षण घेत असलेल्या तरुणींना आपल्या प्रेमजाळ्यात ओढून हिंदू तरुणींचे जीवन उद्ध्वस्त करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. सातारा आणि मुकुंदवाडी परिसरातील हिंदू तरुणींना प्रेमजाळ्यात ओढून पळवून नेल्याच्या घटना ताज्या असताना हडकोतील एका २१ वर्षीय हिंदू तरुणीस नोकरीचे आमिष दाखवून मुस्लिम नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी मुस्लिम नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. न्यायालयाने या तरुणाला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हडको, नवजीवन कॉलनी येथील २१ वर्षीय तरुणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयात एम.कॉम.चे शिक्षण घेते. ती एपीआय कॉर्नरजवळ असलेल्या एका कार्यालयात नोकरीला आहे. मनपा निवडणुकीत एका पक्षाचे काम करीत असताना जटवाडा येथील आरेफ युनूस पटेल याने तिच्याशी ओळख करून संपर्क वाढवला. तसेच आपण लवकरच स्वत:चे कार्यालय उघडणार असून, माझ्या कार्यालयात तुला नोकरी देतो, अशी थाप मारत आरेफ याने या तरुणीशी मैत्री केली.
या तरुणीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर २०१५ ला ही तरुणी आपल्या मैत्रिणीच्या घरी जात असताना बजरंग चौकात आरेफ पटेल याने तिला अडवून थाप मारत आपल्या दुचाकीवर बसवून थेट आरेफ कॉलनीतील एका मित्राच्या घरी नेले व तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर आरेफ याने तिचे अश्लील फोटोही काढले व या फोटोंचा धाक दाखवत, समाजात बदनामी करण्याचा धाक दाखवत त्याने तिला वेळोवेळी मिलकॉर्नर येथील सिटी पॅलेस हॉटेल आणि जटवाड्यातील पटेल प्लॅनेट येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिच्या या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिसांनी आरेफविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ आरेफ युनूस पटेल यास अटक केली. आरेफ पटेल याचे लग्न झालेले असून, त्यास दोन वर्षांची मुलगीदेखील आहे. शिंदे यांनी त्यास कोर्टासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
चार महिन्यांतील तिसरी घटना
सातारा परिसरातील जुनेद पटेल याने एका हिंदू मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते, तसेच मुकुंदवाडी परिसरातील एका हिंदू तरुणीला शेंद्रा येथील बेग नावाच्या मुलाने पळवून नेले आहे. सतत घडत असलेल्या या घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे.





























































