नगर जिह्यात ‘लम्पी’ आटोक्यात येतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिह्यात काही महिन्यांपासून दुधाळ जनावरे, शेतकरी आणि पशुसंवर्धन विभागाला जेरीस आणणाऱया लम्पी आजाराचा संसर्ग कमी होत आहे. गेल्या काही दिवसांत नव्याने बाधित होणाऱया जनावरांची संख्या कमी होत असून, लम्पीवर मात करणाऱया जनावरांची संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी जिह्यात लम्पीबाधित जनावरांची संख्या 46 हजार 776 होती. ती आता 5 हजार 185 पर्यंत खाली आली आहे. लम्पीवर मात करणाऱया जनावरांची टक्केवारी ही 82 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

नगर जिह्यात गेल्या तीन महिन्यांपासून दुधाळ जनावरांमधील लम्पी रोगाने थैमान घातलेले आहे. पशुसंवर्धन विभागाने जिह्यातील 14 लाखांहून अधिक जनावरांचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यानंतरही लम्पीचा प्रकोप सुरू होता. जिह्यातील लम्पी संसर्गाची तीव्रता पाहून केंद्र सरकारने जिह्यात पथक पाठवले होते. या पथकातील तज्ञ डॉक्टरांसह जनावरांच्या रोगावर संशोधन करणारे शास्त्र्ाज्ञदेखील होते. त्यांनी जिह्यात प्रत्यक्षात लम्पीबाधित जनावरे आणि त्यांच्यावर उपचार करणाऱयांची भेट घेऊन माहिती समजून घेतली होती. तसेच, बाधित जनावरांवर करण्यात येणाऱया उपचार पद्धतीत काही सुधारणा सुचवल्या होत्या.

दरम्यान, जिह्यात सध्या 38 हजार 360 जनावरांनी लम्पीवर मात केली असून, 1 हजार 149 गावे लम्पी संसर्गाच्या टप्प्यात होती. दुसरीकडे 3 हजार 231 जनावरे लम्पीमुळे दगावली होती. मात्र, परिस्थिती बदलत असून, जनावरे लम्पीवर मात करताना दिसत आहे. यामुळे काही प्रमाणात पशुसंवर्धन उपचार यंत्रणा आणि शेतकऱयांचा जीव भांडय़ात पडला आहे.

उपचार सुरू असणारी जनावरे

अकोले 247, श्रीरामपूर 81, राहुरी 521, संगमनेर 682, नेवासा 382, कर्जत 352, राहाता 395, पारनेर 472, श्रीगोंदा 340, जामखेड 447, पाथर्डी 406, कोपरगाव 27, शेवगाव 320 आणि नगर 513.