मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. एका ब्युटीशियनला नववधूचा खराब मेकअप करणं चांगलंच भारी पडलं आहे. नववधूने याबाबत जाब विचारला असता पार्लरला संचालिकेने उलट तिलाच दमदाटी करत धमकावले. अखेर नववधूने पोलिसात धाव घेत ब्युटी पार्लरच्या संचालिकेविरोधात तक्रार दाखल केली.
कोतवाली येथील ठाणे अधिकारी अनिल गुप्ता यांनी सांगितले की, 3 डिसेंबरला एका तरुणीचे लग्न होते. नवरीच्या मेकअपसाठी तिच्या घरच्यांनी मोनिका मेकअप स्टुडीओ संचालिका मोनिका पाठकला संपर्क केला. मोनिकाने यावेळी नववधूच्या मेकअपचे साडेतीन हजार रुपये सांगितले. तीन डिसेंबरला जेव्हा ती मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली, त्यावेळी मोनिका तिथे नव्हती. मोनिकाच्या पार्लरमधील अन्य कर्मचाऱ्यांनी तिचा मेकअप केला आणि तो बिघडवला. नववधूला मेकअप पाहून धक्काच बसला, ती संतापली आणि तिने मोनिकाला फोन लावला आणि मेकअप खराब केल्याचे सांगितले. त्यावेळी मोनिकाने उलट तिलाच चार शब्द सुनावले आणि जातिवादक शब्दही बोलली.
ही माहिती सेन वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली, त्यावेळी तेही नाराज झाले. मंगळवारी त्या वधूसोबत असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य पोलीस स्थानकात पोहोचले आणि मोनिका पाठक विरोधात गुन्हा दाखल केला. ठाणा प्रभारी अनिल गुप्ता यांनी सांगितले की, नववधू आणि सेन समाजाद्वारे देण्यात आलेली तक्रार गाभिर्याने घेतली आहे. लवकरच या प्रकरणी मोनिका पाठकची चौकशी करण्यात आली आहे.