
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शरयू तीरावर महाआरती सुरू होताच चंद्रपूर शहरातील विवेक नगर परिसरातील राममंदिरात शिवसैनिकांनी एकत्र येत प्रभू रामचंद्रांची महाआरती केली. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ही आरती करण्यात आली. आरतीच्या आधी व नंतर जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दणाणला.
राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत, असं यावेळी नेत्यांनी सांगितलं. या महाआरतीसाठी माजी विद्यार्थी जिल्हाप्रमुख मनोज पाल, सेना कामगार सेना प्रमुख जयदीप रोडे, राजेश नायडू, महिला जिल्हाध्यक्ष भारती दुधानी, कुसुम उदारयांच्या सह मोठ्या संख्येत शिवसैनिक राम मंदिरात उपस्थित होते.

































































