कोरोनाच्या संकटात गृहिणी, शेतकऱयांची आर्थिक चिंता मिटवणार ‘महाराज्य’ कार्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ही महामारी अजून किती महिने चालेल याची कोणालाच कल्पना नाही. म्हणूनच अशा प्रतिकूल परिस्थितीत आपले कुटुंब व्यवस्थित चालावे यासाठी काक इकोनॉमिकतर्फे गृहिणी महिला आणि शेतकऱयांच्या थेट फायद्यासाठी ‘महाराज्य’ कार्ड सादर करण्यात आले आहे.

‘महाराज्य’कार्डची ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत आहे. याबाबत काक इकोनॉमिकचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक किशोर काकडे म्हणाले, कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बुडाले. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा गृहिणीला आपले घर चालवायचे असते. त्या गृहिणीच्या फायद्यासाठी हे कार्ड आणले आहे. यामुळे गृहिणींची आर्थिक चिंता मिटणार आहे तसेच मोठय़ा प्रमाणात खरेदी झाल्यामुळे शेतकऱयांनाही याचा थेट फायदा होणार आहे. अधिक माहितीसाठी 9987187346 या क्रमांकावर किंवा www.kaakeconomic.com या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.