उच्च दर्जाच्या बियाण्यांसाठी सर्वसमावेशक धोरण आणणार; 3 हजारांहून अधिक तक्रारी दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात बोगस बियाण्याच्या पुरवठ्यासंदर्भात तीन हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सरकारला खडबडून जाग आली असून निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची घोषणा आज करण्यात आली.

बियाणे तपासणीच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीत बदल करून नवीन मानक कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या बियाणेविषयक तक्रारींवर तातडीने कार्यवाही, तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ता नियंत्रण अधिक प्रभावी करणे आणि निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर आणि प्रशासकीय उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येईल, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

परराज्यातील बियाणांवर लक्ष

परराज्यातून येणाऱ्या बियाण्यांवर विशेष तपासणी यासारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.