
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुरुवारी राज्यात 2 हजार 813 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यापैकी एकटय़ा मुंबईत कोरोनाचे 1702 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात गुरुवारी एकूण 1 हजार 47 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील मृत्युदर हा 1.87 टक्के इतका आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 703 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 7998 आहे.

























































