
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
निवृत्त मेजर सुरेंद्र पुनिया यांनी आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका केली असून त्यांना चोर म्हटले आहे. पुनिया यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. टाईम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे.
सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून 2004 पासून सलग चार वेळा निवडणूक जिंकल्या आहेत. त्याच मतदार संघातून मेजर पुनिया यांना निवडणूक लढवायची आहे. ”नेरेंद्र मोदी यांनी मला संधी दिली तर मला सोनिया गांधीविरोधात रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवायला आवडेल. मी आनंदाने हा टास्क स्वीकारेन. ही लढत चौकिदार व चोर यांच्यातील असेल”, असे पुनिया यांनी यावेळी सांगितले.























































