ममतांचा दणका; एका पायावर बंगाल जिंकेन, दोन पायांवर दिल्ली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. सातत्याने बंगाल जिंकण्याचा दावा करणाऱया भाजपावर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज निशाणा साधला. ‘मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि भविष्यात दोन्ही पायांवर दिल्ली काबीज करेन’ अशा शब्दांत त्यांनी भाजपाला बजावले.

ममता बॅनर्जी हुगळीतील देवबंदपूर येथील एका सभेत बोलत होत्या. ‘भाजपाकडे कोणताही स्थानिक उमेदवार नाही. तुम्ही पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक उमेदवार शोधू शकत नाही? टीएमसी आणि सीपीएमकडून लोपं उधार घेतली आहेत, असे टीकास्त्र ममता बॅनर्जी यांनी सोडले.

देशात कोरोना परिस्थिती पाहता बंगालमध्ये अल्पावधीत निवडणूक घ्यायला नको होती का? आठ टप्प्यांत मतदान करण्याची काय आवश्यकता होती, असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला.