अपघाताने जीवनच बदलले; डॉक्टरांना कापावा लागला जखमीचा प्रायव्हेट पार्ट

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे धोकादायक असते. याचा प्रत्यय नुकताच एका व्यक्तीला आला आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चावत असताना त्याचा अपघात झाला. या अपघातानंतर त्याचे जीवनच बदलून गेले आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांचा त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्या व्यक्तीने आपले अनुभव सोळ मिडीयावर शेअर केले आहेत.

अमेरिकेच्या सेंट लुईसमध्ये 2014 मध्ये ही घटना घडली आहे. या भीषण अपघाताबाबत आणि त्याच्या अनुभवाबाबत 29 वर्षांच्या पॉल बेरी यांनी माहिती दिली आहे. ‘द सन यूके’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या अपघातानंतर आपले जीवनच बदलले असल्याचे पॉल यांनी म्हटले आहे.

आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी आपण मिसोरीहून कोलंबियाला जात होतो. कार चालवताना आपण मद्यपान केले होते. मद्यपान करून वाहन चालवणे धोकादायक असते, हे माहिती असूनही आपण ती चूक केली. त्याची मोठी शिक्षा आपल्याला भोगावी लागली, असे पॉल यांनी म्हटले आहे. मद्यपान करून कार चालवत असताना आपले वाहनावरील नियंत्रण सुटले आणि आपल्या कारला अपघात झाला.

या अपघात एवढा भीषण होता की आपण कारच्या बाहेर फेकलो गेलो. त्यानंतर कार उलटून आपल्या अंगावर पडली. त्यामुळे आपण बेशुद्ध पडलो. या अपघातात आपली मान, जबडे, कंबर आणि नाकाला गंभीर जखमा झाल्या होत्या. तसेच प्रायव्हेट पार्ट आणि वृषणांनाही इजा झाली होती. आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातात गंभीर जखमी झाल्याने आपला जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना आपला प्रायव्हेट पार्ट आणि एक वृषण कापण्याचा निर्णय घ्यावा लागला. काही दिवसांनी शुद्धीत आल्यावर डॉक्टरांनी याबाबतची माहिती आपल्याला दिली. त्यामुळे आपल्याला धक्का बसला आणि त्यानंतर आपले जीवनच बदलल्याचे पॉल यांनी सांगितले. अनेक वर्षे उलटले तरी हा अपघात आपल्या स्मरणात असल्याचे त्यांनी सांगितले.

या अपघातानंतर आपले जीवन बदलले आहे. आता आपण आयुष्यात कधीही पिता बनू शकत नाही, याचे दुःख असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातानंतर डॉक्टरांनी आपला प्रायव्हेट पार्टच कापल्याने पौरुषत्व नष्ट झाल्याची भावना मनात निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, कुटुंबिय आणि मित्रपरिवाराने आपल्याला धीर देत या कठीण प्रसंगातून सावरण्यास मदत केल्याचे पॉल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या