
छोट्या पडद्यावरच्या अनेक गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे मॅन व्हर्सेस वाईल्ड. एखाद्या दुर्गम, नैसर्गिक स्थळी अडकल्यानंतर काय करावं, याची माहिती देणारा अत्यंत साहसपूर्ण आणि म्हणूनच मनोरंजक ठरलेला हा कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाला.
या कार्यक्रमाची भुरळ बॉलिवूडकरांना पडली नसती तरच नवल. अक्षय कुमार, अनिल कपूर, अजय देवगण असे कलाकार आजवर या कार्यक्रमात झळकले आहेत. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअर ग्रील्स याच्यासोबत साहसी जंगल सफारी केली आहे.
या यादीत आता अभिनेता विकी कौशलचं नाव जोडलं गेलं आहे. विकीनेच स्वतः याची माहिती दिली आहे. आयुष्यातलं सगळ्यात मोठं साहस आणि तेही बेअर ग्रील्स सोबत. चला पाहुया बेअरने माझ्यासाठी काय नियोजित केलंय. या शोची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होतेय, अशी कॅप्शनही त्याने त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टखाली दिली आहे.
सध्या विकीच्या घरी लगीनघाई सुरू असल्याच्या चर्चा आहेत. अभिनेत्री कतरिना कैफसोबत तो डिसेंबर महिन्यात राजस्थान येथे विवाहबद्ध होत असल्याची वृत्त प्रसारित होत आहेत. त्यामुळे सध्या विकी त्याच्या खासगी आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे.
View this post on Instagram

























































