एका लग्नाची अनोखी गोष्ट! नवऱ्यानेही घातले मंगळसूत्र, स्त्री-पुरुष समानतेसाठी धाडसी निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका लग्नसोहळ्यातील अनोख्या गोष्टीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं. लग्नावेळी नवरा मुलगा नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला सौभाग्याचं लेणं बहाल करतो. मात्र नुकताच एक लग्नसोहळा पार पडला त्यात चक्क नवरीने नवऱयाच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आहे.

स्त्री-पुरुष समानतेसाठी शार्दुल कदम या तरुणाने घेतलेल्या या धाडसी निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अनेकांनी त्याच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.

शार्दुलने लग्नाचे फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिलंय, समाजाकडून मंगळसूत्राकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. फक्त स्त्रियांनीच मंगळसूत्र घालावे असा आपल्याकडे नियम आहे. पण मला हे खटकतं. माझ्या पत्नीवरचं प्रेम दर्शवण्यासाठी आमच्या नात्याचं प्रतीक म्हणून मी हा धागा का घालू नये!’

शार्दूलने पत्नीच्या गळ्यात काळ्या मण्यांचं दोन डोरली असलेलं मंगळसूत्र घातलं. तर याच वेळी तिनेदेखील शार्दूलच्या गळ्यात काळ्या मण्यांच्या माळेत एक गोल चांदीचं पेंडन्ट असलेलं मंगळसूत्र घातलं.