
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना नेते दिवंगत मधुकर सरपोतदार यांच्या पत्नी व शिवसहकार सेनेच्या अध्यक्षा शिल्पा सरपोतदार यांच्या सासूबाई मंगला सरपोतदार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 77 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात सून व नातू असा परिवार आहे. त्यांचे तेरावे शुक्रवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे पूर्व गांधीनगर येथील विनायक सोसायटी या राहत्या घरी होणार आहे.
























































