मनसुख हिरेन हत्या प्रकरणही एनआयएकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ऍण्टेलिया’जवळील स्फोटक प्रकरणाचा तपास करणारी एनआयए आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचाही तपास करणार आहे. आज केंद्र सरकारकडून एनआयएला हिरेन हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्र एटीएसकडे याबाबतचे लेखी आदेश अद्याप आलेले नाही.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास सध्या एटीएस करीत आहे. हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनीच केली असून त्याबाबतचे सबळ पुरावे असल्याचा एटीएसचा दावा आहे. त्याप्रमाणे वाझे यांना अटक करण्यासाठी एटीएसने शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून प्रोडक्शन वॉरंटदेखील मिळवले. पण शनिवारी केंद्र सरकारने हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएला करण्याचे निर्देश दिले. आता याबाबतचे लेखी आदेश आल्यानंतर महाराष्ट्र एटीएस हिरेन मृत्यू प्रकरण पुढील तपासाकरिता एनआयएकडे सोपविणार आहे. दरम्यान, ऍण्टेलियाजवळील स्फोटक प्रकरणात सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात आहेत.