आपणही योगदान देऊया… अवनीच्या बाळांना वाचवूया!

30

सामना ऑनलाईन। मुंबई

अवनी वाघिणीला मारल्याच्या पार्श्वभूमीवर आणि जंगलाचे संरक्षण व्हावे याकरिता देशभरातील सर्व निसर्गप्रेमी एकत्र येणार आहेत. उद्या 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता वरळी सीफेस येथून प्राणी आणि जंगलप्रेमी मोर्चा काढून या घटनेचा निषेध करणार आहेत. गावात बऱ्याच ठिकाणी मानवी वस्तीत वाघ फिरतात. याचे कारण त्या गावातली जंगलतोड… त्यामुळे वाघ शेतात लपून राहतात आणि हल्ला करतात. यामुळेच अवनीला मारले गेले. तिला जाऊन आठवडा झाला तरी तिची पिले अजूनही सापडत नाहीत. ही पिले इतकी छोटी आहेत की, ती स्वतःसाठी शिकारही करू शकत नाहीत. त्यासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याचे प्राणीप्रेमी समीक्षा बापट सांगतात.

परदेशी नागरिकही या घटनेचा निषेध करत आहेत. प्राणीप्रेमी म्हणून नाही तर अवनीच्या मृत्यूबाबतही बऱ्याच जणांमध्ये गैरसमज आहेत. शिवाय आता जिवंत असलेल्या वाघांचा जीव वाचणेही गरजेचे आहे. वनांचे सौंदर्य वन्य प्राण्यांवरच अवलंबून आहे. यासाठी जंगल वाचणे महत्त्वाचे आहे. याबाबत जनजागृती व्हायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या