मसाज घेणाऱ्या महिलेचा मित्रानेच केला विनयभंग

सलूनमध्ये मसाज घेणाऱ्य़ा महिलेचा तिच्याच मित्राने विनयभंग केल्याची घटना निगडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी मित्राला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. महंमद सिराज रज्जब अली (22, रा. रेल विहार कॉलनी, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे मित्र आहेत. फिर्यादी महिला निगडी, संभाजी चौकातील रॉयल सलून येथे डोक्याला मसाज घेत होत्या. त्यावेळी आरोपीने त्यांचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.